सुभाष नलवडे यांना राज्यस्तरीय क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार
पत्रकार नामदेव निर्मळे
दानवाड तालुका शिरोळ येथील प्राथमिक आश्रमशाळा दानवाड येथील प्रभारी मुख्याध्यापक श्री.सुभाष नारायण नलवडे यांनाअविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य महात्मा फुले गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार 2023 गणपतीपुळे येथे एका शानदार सोहळ्यात पुरस्कार (award) देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. किसनराव कुराडे होते.
प्राथमिक आश्रमशाळा दानवाड येथे अनेक विविध उपक्रम राबविले आहेत.अनेक विद्यार्थी व गरजू लोकांना आर्थिक मदत करून सामाजिक कार्यातही महत्वपूर्ण योगदान दिले आहे.आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना आई -वडिलांच्या मायेने काळजी घेवून वंचित घटकांतील मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे.
या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या क्रांतीदेवी कुराडे, सुनीलभाई नारकर, डॉ. प्रकाश चौधरी,संस्थेचे सचिव श्री.संजीव नाईक, आयोजक संजय पवार (पत्रकार) , अविष्कारचे विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी,त्यांचे कुटुंबिय,मित्रमंडळी उपस्थित होते. सुभाष नलवडे यांना पुरस्कार (award) मिळालेबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.