सैनिक टाकळीची कु. कोमल चव्हाण डॉ.जे.जे.मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये तिसरा रँक मध्ये उत्तीर्ण
वार्ताहर :-नामदेव निर्मळे
(local news) सैनिक टाकळी तालुका:- शिरोळ येथील कुमारी कोमल संजय चव्हाण हिने डॉ.जे.जे.मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर एस. जी .पी .ए.8.50 तिसरा रँक मध्ये उत्तीर्ण झाली आहे.
आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना सुद्धा अतिशय जिद्दीने अभ्यास करून तिने गावचे वडिलांचे नाव रोशन केले आहे. आहे त्या परिस्थितीला दोष न देत बसता काहीतरी करून दाखवण्याची मनामध्ये जिद्द आहे.
डॉक्टर जे जे मगदूम चे चेअरमन विजय मगदूम व प्रिन्सिपल सर डॉक्टर एस. एस. पाटील यांनी तिचा सत्कार करण्यात आला . सैनिक टाकळी गावामध्ये तिचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. ८८. ५० टक्के मार्क तिची स्पर्धा परीक्षा देण्याची जिद्द आहे. त्यासाठी तिचे भरपूर प्रयत्न चालू आहेत. (local news)