भरत खोत फौजी यांचा वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद शाळेच्या लांब उडी मैदानासाठी मदत
पत्रकार :-नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका:- शिरोळ जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर टाकळीवाडी येथील लांब उडी मैदानासाठी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत मैदानासाठी रक्कम अदा केले आहे.
भरत खोत नायक या पदावर भारतीय सेना मध्ये आहेत.हे बेळगाव येथे भरती झाले. सध्या आता ते जम्मू-काश्मीरमध्ये बॉर्डर वर देश सेवा करत आहेत. अतिशय गरिबीच्या परिस्थिती मध्ये त्यांनी भारतीय सेना मध्ये सामील झाले. यांचा वाढदिवस आज साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी क्लासमेट 2004 ग्रुप मधील सर्व सैनिक व मित्रमंडळी उपस्थित होते.
भरत खोत बोलताना म्हणाले मला देश सेवा करण्याचे एक संधी मिळालेली आहे. यावेळी सचिन लोहार ( बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) पांडुरंग निर्मळे ( सशस्त्र सीमा बल) अनिकेत उगारे, पांडुरंग सुतार, सुरेश सुतार, उदय कांबळे, नामदेव निर्मळे पत्रकार आदी उपस्थित होते. (local news)