श्री गुरुदत्त शुगर्स चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे साहेब यांनी केले रक्तदान
पत्रकार:- नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा.श्री.राहुल घाटगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाड ,टाकळीवाडी ,घोसरवाड, मजरेवाडी, अकिवाट ,बस्तवाड, राजापूर ,राजापूर वाडी, खिद्रापूर, सैनिक टाकळी, दानवाड, या गावात रक्तदान शिबिर गेली 5 वर्षे ठेवण्यात येत आहेत.
गुरुदत्त शुगर्स ने नेहमी सामाजिक बांधिलकी जपत अनेक निराधार यांना मदत केली आहे. राहुल साहेब यांचा वाढदिवस 14 फेब्रुवारी असून स्वतः त्यांनी रक्तदान (blood donation) केले आहे.
कोणतीही संकट असो नेहमी सर्वप्रथम श्री गुरुदत्त कारखाना पुढे असतो. जनसेवा ही त्यांनी नाळ बांधलेली आहे. प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर ठेवून रक्तदात्यांना भेटवस्तू ठेवण्यात येते.
शेतकऱ्यासाठी अनेक हिताचे निर्णय त्यांनी घेतलेली आहेत. महापूर, कोरोना, काळात अनेक मदतीचा हात पुढे केला. स्वतः त्यांनी रक्तदान (blood donation) करून एक आदर्श निर्माण केला. सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.