मिरजेत 90 लाखांचा गंडा
(crime news) अॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेतील दहा ग्राहकांना सुमारे 90 लाख 61 हजार 128 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी बँकेचा कर्मचारी तोहिद अमीर रिकमसलत (वय 27, रा. मिरज) याच्याविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेचे ग्राहक रिसाज दादापीर कोतवाल (मिरज) अमिना नजीर शेख (गुरुवार पेठ, मिरज), अशोक जिनगोंडा पाटील (मानमोडी रोड, कळंबी), समीर वजीर जमादार (मिरज), वाजिदा शमशुद्दीन कोतवाल, आशिया शमशुद्दीन चाऊस (मिरज), रमेश जमराम सेवानी (मंगळवार पेठ, मिरज), हुसेन इमाम बेपारी (वखारभाग, मिरज), गणी युसूफ गोदड (टाकळी रोड, मिरज), मेहबूब अल्ल्लाबक्ष मुलाणी (मिरज) या दहा ग्राहकांची फसवणूक झाली आहे. याबाबत बँकेचे साजिद बाबालाल पटेल (वय 38, रा. विजयनगर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयित तोहिद रिकमसलत याच्याकडे बँकेच्या ग्राहकांना भेटून सेव्हिंग व करंट खाते उघडण्याची जबाबदारी दिली होती. रिकमसलत याने ग्राहकांचा विश्वास संपादन करून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता ग्राहकांकडून काही रक्कम घेतली. तसेच त्यांच्या खात्यावरूनही त्याने रक्कम काढून काढून घेतली. एप्रिल 2019 ते दि. 16 फेब्रुवारी 2023 या कालावधीत त्यान 90 लाख 61 हजार 128 रुपयांची त्याने फसवणूक केली. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर बँकेने चौकशी केली. यामध्ये रिकमसलत हा दोषी आढळून आला. त्यामुळे बँकेने त्याच्याविरूद्ध फिर्याद दाखल केली. (crime news)