टाकळीवाडी मध्ये प्रेम निर्मळे फोटोग्राफी उद्घाटनला चक्क इंस्टाग्राम स्टार व टायगर ग्रुप यांची हजेरी
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथील प्रेम फोटो स्टुडिओचे मालक मोहन निर्मळे व प्रेम निर्मळे यांच्या फोटो स्टुडिओ उद्घाटनला इंस्टाग्राम स्टार शिंदा मावशी, स्टार विनेश कांबळे, अभिनेता अशोक तेलगी , टायगर ग्रुप चे पैलवान पिंटू भाऊ माने टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य( सांगली जिल्हा) यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
गेली दोन दिवस गावामध्ये शिंदा मावशी येणार याची चर्चा जोरात चालू होती.आकर्षक रोषणाई , आकर्षक फटाके , डी.जे. साऊंड हे आकर्षक ठरले. टाकळीवाडी सारख्या खेडेगावात प्रथमच टायगर ग्रुप व स्टार यांची हजेरी लागली. शिंदा मावशीने आपल्या बोलण्याच्या कौशल्याने अनेक डायलॉग बोलल्यामुळे सर्वजणांना आकर्षक केले.
अनेक महिला स्टार शिंदा मावशी यांच्याबरोबर फोटो घेण्यासाठी महिलांची धडपड चालू होती. यावेळी सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व आजी-माजी सैनिक, टायगर ग्रुप चे कार्यकर्ते निशांत गोरे ,गणेश भाऊ गोरे, प्रज्वलभाऊ कोळी, गावातील सर्व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (local news)