जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर येथे श्री रघुनाथ रामचंद्र बाबर यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त पार कट्टा बांधला
पत्रकार नामदेव निर्मळे
टाकळीवाडी येथील जिल्हा परिषद शाळा (school) कुमार विद्यामंदिर येथे श्री रघुनाथ रामचंद्र बाबर यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त कु.युगंधर धोंडीराम बाबर राहणार सैनिक टाकळी तालुका:- शिरोळ यांच्यावतीने पार कट्टा बांधण्यात आला.
एक आठवण रहावी या हेतूने हा पार कट्टा बांधण्यात आला. व पिंपळाच्या झाडाचे रक्षण सुद्धा झाले .यातच माझे समाधान आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सर्वप्रथम पहिल्यांदाच हा पिंपळाच्या झाडाला पार कट्टा शाळेमध्ये (school) बांधण्यात आला.