टाकळीवाडी गावच्या सौ रूपाली राकेश जुगळे यांना सावित्रीची लेक पुरस्कार
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका :-शिरोळ येथील8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रातील कार्य व उद्योग व्यवसाय क्षेत्रातील लेखनीय कामगिरी पाहून त्यांना सावित्रीची लेक या पुरस्कार अंजलीताई प्रकाश आंबेडकर व श्रीदत्त साखर कारखान्याचे उद्यान पंडित चेअरमन मा. गणपतराव पाटील दादा यांच्या हस्ते देण्यात आला.
१२ वर्षापासून एल.आय.सी व इतर इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांचे नॅपकिन बुके प्रोडक्शन ही सुरू आहे. आणि याच सोबत त्या एक सैनिकाच्या पत्नी असल्यामुळे सैनिकांच्या महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांना उद्योग व्यवसाय मिळवून देण्यासाठी त्या सतत कार्यरत असतात. सैनिक फेडरेशन कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. (local news)