श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचालित श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे जागतिक महिला दिन संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ उज्वला बदामे व प्रमुख उपस्थितीमध्ये पूजा जोशी व शामली जोशी या होत्या.
दिनांक 8 मार्च रोजी विद्यालयात जागतिक महिला दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थिनींनी देशातील महान महिला समाजसेविका, नेत्या, कलाकार यांच्या वेशभूषेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. कु. शामली जोशी व पूजा जोशी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संजय तपासे यांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. सर्व महिलांचा सन्मान भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
सदर कार्यक्रमास सुरेखा कोथळी, भारती बस्तवाडे, प्रमिला आवटी, बाळाबाई हाके, गौराबाई चिगरे, श्रीमती जयश्री मलिकवाडे, अर्पिता मलिकवाडे व गावातील मान्यवर महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पाटील यांनी केले. आभार श्री संजय माळी यांनी मानले. (local news)