जिल्हा परिषद कोल्हापूर तारांगणा पुरस्कार प्राप्त विजेते कु. स्वरा व शौर्या निर्मळे यांचा महिला दिनानिमित्त सत्कार
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील कुमारी स्वरा नामदेव निर्मळे व शौर्या नामदेव निर्मळे यांची नाकाला जिभ लावण्याची कला आहे. वय वर्षे ५ व ३ वर्षे या वयात दोघी सख्या बहिणीने एका मिनिटात 72 वेळा व ३८ वेळा १ मिनिटात नाकाला जीभ लावून त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद झाली.
या रेकॉर्डमुळे गावचे नाव लौकिक झाले. खेळण्याबागडण्याच्या वयात काहीतरी वेगळी कला करून दाखवल्याने चर्चेचा विषय ठरला. याची दखल महाराष्ट्रातील सर्व मीडिया ग्रुप व तसेच कर्नाटकातील वर्तमानपत्रात सुद्धा या कलेची दखल घेण्यात आली. महिला सुद्धा कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत. याची दखल घेत अभिनव बाल विकास मंदिर व परिवर्तन प्राथमिक शाळा दत्तवाड यांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. (local news)
सत्कार कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर केल्याने सर्व महिलांना आश्चर्याचा धक्का बसला. वय लहान कीर्ती महान असा शब्द महिलांच्या मधून येत होता. यावेळी शाळेचे चेअरमन मा.बबन चौगुले, मुख्याध्यापक पुंडलिक खोत, सर्व शिक्षक, शिक्षिका, सर्व विद्यार्थी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होत्या.