टाकळीवाडी येथील दोघांची राज्य परिवहन महामंडळ मध्ये चालक तथा वाहक पदी निवड
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथील सुपुत्र विश्वजीत सरदार काणे व सुपुत्र विनायक अनंत सुतार या दोघांची एकाच वेळी एस.टी महामंडळ मध्ये चालक तथा वाहक पदी निवड झाली.
विनायक सुतार यांचे शिक्षण दहावी झाले असून ते आता इचलकरंजी आगार मध्ये चालक तथा वाहक म्हणून काम करत आहेत. विश्वजीत काणे यांचे शिक्षण ग्रॅज्युएशन झाले. असून इचलकरंजी आगार मध्ये चालक तथा वाहक या पदावर रुजू झाले आहेत. या दोघांची प्रशिक्षण कोल्हापूर विभागामध्ये झाले. या दोघांना नियुक्ती 11 फेब्रुवारी 2023 रोजी मिळाली.
अतिशय कष्टाने व जिद्दीने त्यांची निवड झाली. गावांमध्ये कौतुकाचा विषय ठरलेला आहे. अतिशय बिकट परिस्थितीतून त्यांनी दिवस काढले. त्याचे कुठेतरी कष्टाचे चीज झाले असे ते बोलताना म्हणाले. (local news)