परिवर्तन शाळा दत्तवाड येथे नाविन्यपूर्ण उपक्रमांनी महिला दिन उत्साहात संपन्न
पत्रकार नामदेव निर्मळे
दत्तवाड येथील परिवर्तन प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. दिनांक 9 मार्च रोजी सकाळी विद्यार्थी व महिला पालकांची भव्य फनी गेम्सचा कार्यक्रम झाला. दुपारी मा. सौ. नीलमताई माणगावे यांचे महिला (women) प्रबोधन पर व्याख्यान झाले.
उंच माझा झोका या कार्यक्रमाअंतर्गत दत्तवाड व परिसरातील विशेष कर्तृत्ववान महिलांचा (women) सत्कार करण्यात आला. यात विविध क्षेत्रातील महिलांची निवड करण्यात आली होती. व सायंकाळी संस्कृती मंच इचलकरंजी यांचा मंगळा गौरी कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच दिनांक 10 मार्च रोजी सकाळी विदयार्थ्यान्च्या आई वडिलांच्या पायपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दत्तवाड व परिसरात हा कार्यक्रम पहिल्यांदा च घेण्यात आला. दुपारी सर्व विद्यार्थ्यांसाठी फैजान मॅजिशियन कोल्हापूर यांचा जादूचा कार्यक्रम झाला. व सायंकाळी क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या विदयार्थ्याचा पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमा वेळी जीवन शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव मा. श्री. बबन चौगुले, संचालक अजित वठारे, सक्काना सिदनाळे, कुमार कुंभार, अशोक नेर्ले, उपाध्ये गुरुजी, मुख्याध्यापक श्री खोत पी.पी. सर्व शिक्षक शिक्षिका. पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.