शिरोळ नृसिंहवाडी येथील 250 एकर क्षारपड जमीन सुधारणा कामाचा शुभारंभ

शिरोळ (प्रतिनिधी) :

आत्तापर्यंत मी पुराणात वाचले होते की, भगीरथाने गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणले. म्हणजे अशक्य काम शक्य करून दाखवले. पण इथल्या शेतकऱ्यांनी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘असाध्य ते साध्य करिता सायास’, हे शक्य आहे हे दाखवून दिले आहे. दादांनी इथल्या क्षारपड (saline) झालेल्या, वाळवंट बनलेल्या जमिनीला पुन्हा हिरवेगार करून दाखवले आहे. माझ्या दृष्टीने क्षारपड मुक्तीचे काम म्हणजे मानवी श्रमाचे अद्भुत उदाहरण आहे, असे उद्गार जेष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी काढले.

कै. श्री. पी. के. माने सर क्षारपड जमीन सुधारणा व कृषी पूरक उद्योग सहकारी संस्था मर्यादित शिरोळ, श्री म्हाळसाकांत सह. सच्छिद्र पाईपलाईन संस्था शिरोळ नृसिंहवाडी यांच्या वतीने शिरोळ नृसिंहवाडी हद्दीतील 250 एकर क्षेत्रावर सर्व्हे कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राजा शिरगुप्पे बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी व श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, आपली जमीन क्षारपड मुक्त व्हावी यासाठी शेतकऱ्यांच्या मध्ये जागरूकता निर्माण झाली आहे ही बाब खरोखरीच कौतुकास्पद आहे. श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना या प्रकल्पासाठी सर्व ती मदत केली जात आहे. आत्तापर्यंत साडेसात हजार एकरावर क्षारपड (saline) मुक्तीचे काम झाले असून शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना व इंजिनिअर किर्तीवर्धन मरजे यांनी या योजनेची संपूर्ण माहिती सांगितली. दत्तचे संचालक दरगु गावडे, हसन देसाई, पवन शेट्टी- नृसिंहवाडी यांनीही मनोगत व्यक्त केले.

स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग माने यांनी केले. आभार प्रकाश माने यांनी मानले. यावेळी इंजिनिअर सुदर्शन तकडे, नगरसेवक श्रीवर्धन देशमुख, रघुनाथ माने, डी. आर. माने, सौ. कमल माने, अशोक माने, तात्यासो माने, सुनील देशमुख, भीम गावडे, सयाजी माने, आनंदराव माने, नरेंद्र माने, सागर मोरबाळे, पृथ्वीराज गावडे, शिवाजी माने, अविनाश माने, जी. के. माने, श्री सुतार आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *