अकिवाट येथे महिला दिनी प्रगती महिला मंडळाचे उद्घघाटन
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) अकिवाट व गुरूदत्त शुगर्स परिसरातील महिलांनी संघटीत होऊन प्रगती महिला मंडळ, अकिवाट या नावाने मंडळाची स्थापना केली आहे. दिनांक १/०३/२०२३ रोजी धर्मादाय आयुक्त कोल्हापूर या कार्यालयाकडे नोंदणी केली आहे.
८ मार्च जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मंडळाच्या नामफलकाचे उदघाटन गुरुदत्त शुगर्स चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे,कार्यालयाचे उद्धघाटन कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने तर कार्यक्रमाचे उद्घघाटन अकिवाटच्या लोकनियुक्त सरपंच वंदना पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राहुल घाटगे म्हणाले की प्रगती महिला मंडळाच्या प्रत्येक कार्यात गुरूदत्त शुगर्सचा खारीचा वाटा असेल.महिलाना सक्षम करण्यासाठी महिलांनी लघुउद्योगाकडे वळले पाहिजे यासाठी शासनाकडून मदत मिळवून देईन असे आश्वासन अशोकराव माने यांनी दिले.तर सरपंच वंदना पाटील यांनी ग्रामपंचायत कडून जे काही मदत करता येईल ते करेन असे ग्वाही दिल्या.
महिला सक्षमीकरण या विषयावर बोलताना प्रसिद्ध वक्त्या श्रीमती नागावे मॅडम म्हणाल्या की कुटुंबातील स्त्री ने सकारात्मकता अंगी बाणवली, एकमेकांना समजावून घेतले,आदर राखला तर त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊन वाद-विवादास सुरूवात होणार नाही. त्यामुळे प्रत्येक स्त्री ने कुटुंबातील एक मैत्रीण म्हणून राहून स्वतःच्या कलागुणांना वाव दिला तर महिला सक्षम होतील व त्यांना इतरांचे सहकार्य मिळते.प्रमुख पाहुणे शोभा सतिश मलमे म्हणाल्या की महिलांनी चुल-मुल सांभाळत घराबाहेर पडून आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला पाहिजे तरच प्रगती होईल असे मत व्यक्त केल्या.माजी आमदार उल्हास पाटील यांच्या पत्नी सौ.उज्वला पाटील यांनी महिला दिना बाबत माहिती सांगितली.अध्यक्षस्थानावरून बोलताना समाज कल्याण जिल्हा परिषदेच्या सभापती स्वाती सासणे म्हणाल्या की आपल्या पतीचा विश्वास संपादन केला पाहिजे त्यामुळे आपल्याला त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या कलागुणांना वाव मिळतो.(local news)
यावेळी अकिवाट ग्रामपंचायत उपसरपंच रत्ना सावंत, सदस्य शितल हळिंगळे यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी वंदना आंबी व अश्विनी पिंपळे यांनी स्वागत गीत सादर केले तर अध्यक्षा रंजना रजपूत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.सचीव माधूरी पोतदार यांनी प्रास्ताविकातून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आमच्या महिला मंडळाचे ध्येय असल्याचे सांगितले.शेवटी उपस्थितांचे आभार उपाध्यक्षा ज्योती रजपुत यांनी मानले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैनिक फेडरेशन कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा रूपाली जुगळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रगती महिला मंडळाचे खजिनदार-भाग्यश्री मिठारे,संचालिका-अश्वीनी पाटील,चंपाबाई सौंदत्ते, सुजाता कुंभार,वंदना रजपूत, सुनिता रजपूत,शिल्पा मिठारे, सुनंदा रजपूत यांनी नियोजन केले.सदरचे कार्यक्रम गुरूदत्त शुगर्स समोर,पांडुसिंग रजपूत यांच्या घराशेजारी असणार्या मंडळाच्या कार्यालया समोर मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिला मंडळाच्या सदस्यांच्या समवेत उत्साहात पार पडला.