आकिवाट येथील शेतकरी संतोष नाना सावंत शेतकऱ्यांना ठरले वरदान

पत्रकार नामदेव निर्मळे

अकिवाट तालुका :-शिरोळ. जिल्हा:- कोल्हापूर येथील शेतकरी संतोष नाना सावंत .राहणार आकिवाट यांनी आपल्या २० गुंठे शेतामध्ये अनेक प्रकारचे फळभाज्या सेंद्रीय (Organic) पद्धतीने पिकवल्या आहेत. संतोष सावंत हे एक कष्टकरी शेतकरी असून त्यांनी आपल्या २० गुंठ्यामध्ये ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून अनेक फळभाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकवले आहेत.

बटाटा, वरणा, कोथिंबीर, धने, लसूण, कांदा, हरभरा, मोहरी, डेलच्या इत्यादी पीक अगदी जोमात आणले आहे. संतोष सावंत हे कमी क्षेत्र असल्यामुळे एक ऊस पिकावर अवलंबून न राहता त्यांनी आंतरपीक म्हणून अनेक पिके घेतले आहेत .

त्यांचे हे पीक पाहण्यासाठी गावातील शेतकरी त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्याकडून सेंद्रिय (Organic) शेतीची माहिती घेतात. व इतर शेतकऱ्यांना संतोष सावंत हे मार्गदर्शन करतात. आकिवाट गावामध्ये संतोष सावंत यांचे सेंद्रिय शेती उत्तम प्रकारे घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक व मार्गदर्शन नागरिक घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *