जिल्हा परिषद शाळा कुमार विद्या मंदिर टाकळीवाडीचे प्रज्ञाशोध चाळणी परीक्षेमध्ये घवघवीत यश
पत्रकार नामदेव निर्मळे
टाकळीवाडी येथील जिल्हा परिषद कुमार विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांची २७/०३/२०२३ रोजी झालेल्या कोल्हापूर जिल्हा अंतर्गत प्रज्ञाशोध चाळणी परीक्षेमध्ये इयत्ता ४थी विद्यार्थ्यांच (students) घवघवीत यश.
कुमार सर्वेश संतोष तेली इयत्ता ४थी या विद्यार्थ्यांने २०० पैकी १६२ गुण मिळवून दत्तवाड केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. व त्याची निवड तालुकास्तरीय परीक्षेसाठी निवड झाली आहे.
त्याला शाळेचे मुख्याध्यापक श्री दळवी सर तसेच वर्गशिक्षक सौ शर्मिला कोल्हापुरे मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्वेश चे वडील संतोष तेली यांनी अतिशय कष्टातून सर्वेशला पुढे घेऊन जाण्यासाठी धडपडत आहेत. ते बोलताना म्हणाले सर्वेश नक्कीच गावचे नाव रोशन करील.
सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी (students) कुठे कमी नाहीत. हे त्याने दाखवून दिले आहे.