गणपतरावदादा पाटील हे एक द्रष्टे नेतृत्व : प्रसाद कुलकर्णी
शिरोळ/प्रतिनिधी:
(local news) श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी आदर्श पद्धतीने सहकारी साखर कारखाना चालवण्यापासून ते क्षारपड जमिनीच्या विकासापर्यंत शास्त्रीय दृष्टिकोनाचा स्वीकार करून विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी मैत्री राखत जे कार्य केले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे.
कालवश डॉ .आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर आधारित अधिक विकासात्मक भूमिका घेऊन गणपतराव दादांनी सहकार, शिक्षण आदी विविध क्षेत्रात सुरू ठेवलेले कार्य अतिशय समाजोपयोगी आहे. गणपतराव दादा हे व्यापक समाजभान असलेले एक द्रष्टे नेतृत्व आहे. त्यांना न्यूज १८ लोकमत समूहाचा ‘महाराष्ट्र गौरव सहकाररत्न’ हा मिळालेला पुरस्कार अतिशय उचित व प्रेरणादायक आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ते दत्त कारखाना कार्यस्थळावर समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गणपतराव पाटील यांचा सत्कार करताना बोलत होते. समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गणपतराव पाटील यांचा शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गणपतरावदादा पाटील यांनी समाजवादी प्रबोधिनीच्या सातत्यपूर्ण लोकप्रबोधन कार्याचा व विविध उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच प्रबोधिनीच्या कामाला आपले सर्वतोपरी सहकार्य आहे असे सांगितले. यावेळी अंबाप्रसाद नानिवडेकर, नगरसेवक संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (local news)