टाकळीवाडी मध्ये हनुमान जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील गावामध्ये पुरातन हनुमान मंदिर आहे. आज या ठिकाणी जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
सध्या विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार चालू आहे. त्यामुळे यावर्षी साध्या पद्धतीने जन्मोत्सव साजरा केला. अतिशय शुभक अशी मूर्ती आहे. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाळणा अतिशय आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलेला होता.
भजनाचा कार्यक्रम झाला. भक्ती भावाने आज हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गावातील सर्व सांप्रदायिक भजनी मंडळ, समस्त गावकरी, उपस्थित होते. (local news)