अकरा वर्षाचा मुलगा अचानक गायब झाला, प्रकरणाचा उलगडा होताच सर्व चक्रावले

(crime news) आईला आपल्या प्रियकरासोबत नको स्थितीत पाहिले म्हणून आईच्या प्रियकरानेच मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना राजस्थानमध्ये उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. नगेंद्र उर्फ नेगी मीणा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. मुलगा आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने आईच्या प्रियकराने त्याला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी त्याला संपवले. आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आई शेतावर गेल्यानंतर मुलाचे अपहरण केले

हरिपुरा गावात राहणारी गोवर्धनी ही 3 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे शेतावर कामाला गेली होती. यावेळी तिचा 11 वर्षाचा मुलगा घरी एकटा होता. विजय बैरवा शेतावरुन घरी परतली तेव्हा मुलगा घरी नव्हता. तिने त्याला सर्वत्र शोधले. मात्र तो कुठेही सापडला नाही. अखेर तिने पोलीस ठाणे गाठत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाचा सर्वत्र शोध सुरु केला. यानंतर 8 एप्रिल रोजी हरिपुरा गावातील शेतात मुलाचा मृतदेह आढळला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी, एफएसएल पथक, श्वान पथक आणि सायबर पथकाने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील पुरावे गोळा करत पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. यानंतर पोलीस चौकशीत आईच्या प्रियकरावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. (crime news)

आरोपीने फूस लावून मुलाला शेतात नेले आणि हत्या केली

आरोपी नेगीने 3 एप्रिल रोजी मोबाईल फ्लाइट मोडवर ठेवला. त्यानंतर तो रामगढ गावातून कच्च्या रस्त्याने हरिपुरा येथे पोहोचला. यावेळी घराजवळ खेळत असलेल्या प्रेयसीच्या मुलाला त्याने फूल लावून शेतात नेले. यानंतर मुलाची हत्या करुन मृतदेह लपवून ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *