भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना समिती टाकळीवाडी अध्यक्षपदी श्री नंदकुमार राजाराम कांबळे यांची निवड
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे राजश्री शाहू कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ टाकळीवाडी यांच्यावतीने भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना समिती निवड मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
अध्यक्षपदी श्री नंदकुमार राजाराम कांबळे (माजी सैनिक), यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी श्री उदय रघुनाथ कांबळे, सचिव पदी श्री बळीराज सुरजाप्पा माळगे (माजी सैनिक),खजिनदारपदी श्री रमेश रावजी निर्मळे( माजी ऑनरेरी कॅप्टन) यांची निवड करण्यात आली.
राजश्री शाहू कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ टाकळीवाडी संस्थापक अध्यक्ष श्री तानाजी श्रीपती गोरे नूतन अध्यक्ष ऋषिकेश दिनकर माळगे, उपाध्यक्ष धीरज माणिक कांबळे, व अभिषेक अनिल कांबळे तसेच सचिव पदी सचिन युवराज माळगे, खजिनदार पदी योगेश कृष्णा कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
राजर्षी शाहू कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे आधारस्तंभ श्री बळीराज माळगे ( माजी सैनिक) श्री केंदबा श्रीकांत कांबळे (तंटामुक्त अध्यक्ष व माजी सुभेदार)श्री महेश मधुकर कांबळे अण्णा,( युवा नेते ) उदय रघुनाथ कांबळे ( युवा नेते) आधारस्तंभ नंदकुमार राजाराम कांबळे माजी सैनिक सर्व पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. (local news)
नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाजीराव गोरे , संजय कुंभार विट उद्योजक, तानाजी निवृत्ती गोरे, लक्ष्मण भमाणे तसेच यावेळी महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.