आतापर्यंत १०० किल्ले पदभ्रमंती करणारे जिल्हा परिषद शिक्षक रुपेश बागडी
पत्रकार नामदेव निर्मळे
मजरेवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रुपेश बागडी यांना महाराष्ट्रातील गड किल्ले फिरण्याचा छंद आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले (fort) फिरण्याचा, गड किल्ल्यावर पायी ट्रेकिंग करत जाऊन सह्याद्रीचे सौंदर्य निहाळण्याचा आहे.
मासाहेब जिजाऊ, छत्रपती शहाजीराजे ,छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी राजे आणि असंख्य मावळे ,सेनापती आणि सरदार यांचा सुवर्ण स्पर्श ज्या किल्ल्यांना झाला ते किल्ले पाहण्याचा योग आम्हाला ट्रेनिंगच्या निमित्ताने मिळत आहे.
सुट्टी असली की आमचे मित्र सुभाष पाटील, उत्तम पाटील, सुनील मगदूम, प्रमोद साळुंखे, रावजी भुरे, रावसाहेब मडीवाळ, मनोज कोळी, प्रीतम गवंडी, आम्ही एकत्र येऊन कोणता ना कोणता गड फिरतोच. सह्याद्रीचे सौंदर्य पाहताना एक गोष्ट जाणवतेच निसर्गाला आव्हान नाही.
खरोखरच मोठे पर्वत पाहून आपला सर्व अहंकार, गर्व ,ताठा गळून पडतो. या निसर्गापुढे सत्ता, संपत्ती ,पैसा काहीच नाही असे वाटून जाते. सह्याद्रीतील प्रत्येक गड काही वेगळी शिकवण देऊन जाणारा आहे. महाराजांनी किल्ल्याला का महत्व दिले?हे त्या किल्ल्याचे स्थान बघूनच आपल्या लक्षात येते. प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक गडाचे रुप काही वेगळेच असते. कामाच्या व्यापात माणूस पुरता हरवून गेला आहे.
माणसे घराबाहेर पडली तर सरळ देवदर्शनाला जातात .पण आम्ही जातो आमच्या महाराजांनी बांधलेल्या, मावळ्याने रक्षण केलेल्या गडावर. प्रत्येक गडावर महाराजांचा आभास आपल्याला होतो. महाराष्ट्रातील हे गड किल्ले त्यांच्या भव्यतेने ,शौर्याच्या कहाणीने तुम्हाला थक्क करून सोडतील. या किल्ल्यामधून इतिहासाच्या पाऊल खुणा तुम्हाला सापडतील .कसं होतं त्यावेळीच जीवन? याची झलक सुद्धा तुम्हाला या किल्ल्यामुळे लक्षात येईल.
आजच्या धकाधकीच्या जीवनात निसर्गाचा सहवास लाभणे खूप आवश्यक आहे. गड (fort) हे तीव्र चढण्याची असल्यामुळे ह्रदय, फुफुस यांची कार्यक्षमता वाढून आरोग्य चांगले राहते. आम्ही आजपर्यंत शंभरच्या वर गड किल्ले फिरलो आहोत .
प्रत्येक गड काहीतरी वेगळं शिकून गेला .
किल्ल्याच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतला. असेच निसर्गाबरोबर दोन हात करत ट्रेकिंगचा अनुभव आम्ही घेत असतो .त्याचप्रमाणे प्राचीन दुर्गम भागातील मंदिरे, धरण ,बॅक वॉटर धबधबे, कास पठार ज्या ठिकाणी चालत जावे लागतं अशा ठिकाणी आम्ही जात असतो. तीन चार दिवसाची शिधा सोबतच असते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्यासाठी सह्याद्री मध्ये गड किल्ले वसवले. महाराष्ट्रातील उर्वरीत किल्ले फिरून पूर्ण करणे. असे ते बोलताना म्हणाले