कै.श्रीपाद दादू बदामे (माजी सैनिक)यांचे स्मरणार्थ 101 माळकरी यांना टाकळीवाडी ते श्रीक्षेत्र पंढरपूर दर्शन सोहळा
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील कैलासवासी श्रीपाद दादू बदामे माजी सैनिक यांचे स्मरणार्थ टाकळीवाडीतील 101 माळकरी व्यक्तींना क्षेत्र पंढरपूर दर्शन सोहळा संपन्न झाला.
कै.श्रीपाल दादू बदामे यांचे चिरंजीव संजय बदामे व राजू बदामे यांच्या वतीने टाकळीवाडीतील 101 माळकरी यांना श्रीक्षेत्र पंढरपूर दर्शन घडवून आणले.
संपूर्ण 101 माळकरी यांच्यावतीने एकादशी वेळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. दुवादस दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. अतिशय भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या गजरात हा कार्यक्रम संपन्न झाला. टाकळीवाडी मध्ये रेकॉर्ड झाले अशी चर्चा जोरात गावात चालू होती. (local news)