डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना पोलीस अधिकारी
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील गावचे सुपुत्र गणपती खोत साहेब (पी.एस.आय) व शहाजी खांडेकर पोलीस अधिकारी, रवींद्र माळी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांनी डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
हे सर्व अधिकारी कोल्हापूर पोलीस मुख्यालयात आपली सेवा बजावतात. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार यांच्या बद्दल त्यांना आदर आहे. आमदार साहेबांनी सुद्धा सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक करून भरभरून शुभेच्छा दिल्या. गणपती खोत साहेब बोलताना म्हणाले की आमची त्यांच्यावर निष्ठा आहे, प्रेम आहे. व त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच भावना सर्व अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.(local news)