नांदणीमध्ये जैन क्षुल्लिका दीक्षा महोत्सव

नांदणी /प्रतिनिधी:

(local news) श्री 1008 भगवान शांतिनाथ जिनमंदिरामध्ये समाधी सम्राट परम पूज्य आचार्य श्री 108 सुबलसागरजी मुनी महाराज यांच्या शिष्या बालब्रह्मचारिणी कु. कमल भूपाल (बाळकू) उपाध्ये यांचा निर्यापक आचार्य प. पू. श्री 108 शांतिसेन मुनी महाराजजींच्या आशीर्वादाने संघस्थ क्षु. 105 वृषभमती माताजींच्या सानिध्यात क्षुल्लिका दीक्षा विधी समारोह सोमवार दि. 1 मे रोजी संपन्न झाला.

या दिवशी सकाळी मंगलगीत, गोदभरणी, अभिषेक पूजन, महाशांतीधारा व गणधर वलय पूजन होऊन दिक्षा विधीचा कार्यक्रम मंत्रविधीने पूर्ण होऊन क्षु. 105 अवधिमतीमाताजी असे नामकरण करण्यात आले. (local news)

यावेळी बहुसंख्य श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत नमोकर मंत्राच्या जयघोषामध्ये अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. दि. 6 एप्रिल पासून नियम सल्लेखना सुरू असून अनेक श्रावक श्राविका दर्शनाचा लाभ घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *