कुमार सर्वेश संतोष तेली याची प्रज्ञाशोध परीक्षेत गगन भरारी

पत्रकार नामदेव निर्मळे

टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद कुमार विद्या मंदिर या शाळेचा (school) विद्यार्थी कुमार सर्वेश संतोष तेली याने जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये अंतिम जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये १९ वा व तालुका यादी क्रमांक मध्ये ११ वा मिळवून त्याने गावचे उज्वल नाव केले आहे.

या अगोदर त्यांने ऋणानुबंध परीक्षेमध्ये २ रा क्रमांक व केंद्रात १ला क्रमांक तसेच तालुक्यात ११ वा क्रमांक मिळवून शाळेचे ,सर्व शिक्षक, यांचे गावचे नाव रोशन केले आहे.

मनामध्ये जिद्द काय तर करून दाखवण्याची व जिल्हा परिषद (school) शाळेतील शिक्षक कुठे कमी नाहीत. हे त्याने दाखवून दिले आहे. त्याचे वडील संतोष तेली म्हणाले की माझा मुलगा कडून गावचे नाव, शाळेचे नाव उज्वल केले आहे. इथून पुढे सुद्धा त्याने नाव रोशन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सर्वेश ची आई मीनाक्षी संतोष तेली हे सर्वेश च्या अभ्यासाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत आहेत. सर्वत्र त्याचे कौतुक होत असून गावामध्ये त्याचे डिजिटल लावून नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *