टाकळीवाडीचे सुपुत्र राहुल आप्पासो बस्तवाडे यांची भुकरमापक भूमी अभिलेख मध्ये निवड
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सुपुत्र राहुल आप्पासो बस्तवाडे यांची भुकरमापक भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन मध्ये निवड झाली. यांचे शिक्षण बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग अतिशय कष्टाने व जिद्दीने पूर्ण केले आहे. टाकळीवाडी सारख्या साध्या खेड्या गावातून मुले आता पुढे जात आहेत.
यांचे प्राथमिक शिक्षण टाकळीवाडी येथील जिल्हा परिषद कुमार विद्यामंदिर शाळेमध्ये झाले. लहानपणापासून अतिशय हुशार व मनामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्याकडे होती. सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून गावचे नाव रोशन झाले याचा सार्थ अभिमान मला वाटत आहे. असे त्यांचे वडील आप्पासो बस्तवाडे हे बोलताना म्हणाले. (local news)