मजरेवाडी येथील जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी देवी व मरी आईची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
पत्रकार नामदेव निर्मळे
मजरेवाडी तालुका शिरोळ येथील पुरातन जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी मरी आई (goddess) देवी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पुरातन मंदिर पटवर्धन सरकारांच्या काळातील असून याचा जिर्णोद्धार पटवर्धन सरकारांनी केला.
तीन दिवस यात्रा भरली असून यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ढोल वाद्याच्या गजरात लक्ष्मी देवीच्या (goddess) नावानं चांगभलं गजरात अनेक भाविक भक्तांनी आपली मनोकामना व्यक्त केली.
गावातील अनेक तरुण मंडळांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या मध्ये अह बुलाकच ,वक्रतुंड गणेशोस्तव मंडळ, जय हिंद ,पेठेचा राजा, पिहिताश्रव तरुण मंडळ, दत्तराज तरुण मंडळ, बसवेश्वर तरुण मंडळ, अहिल्यादेवी तरुण मंडळ, विठ्ठल मंदिर तरुण मंडळ, विश्व शक्ती तरुण मंडळ, माळभाग तरुण मंडळ तसेच माळभागातील सर्व मंडळ या मंडळा चा सहभाग लाभला.
गावामध्ये प्रत्येक मंडळाकडून चहापाणी तसेच नाष्टाची सुविधा करण्यात आलेली होती. व मंडळांनी रांगोळी विविध सजावट, लाइटिंग माळ, आदी गोष्टी करून कार्यक्रमात शोभा वाढवली. सायंकाळी पालखी मिरवणूक व धनगरी ढोल च्या गजरात बँडच्या सुरात आतषबाजी च्या दणक्यात पालखी मिरवणुक संपन झाली. यात्रा कमिटी मार्फत सर्व मंडळाचे आभार मानण्यात आले.