टाकळीवाडीतील शेतकऱ्याचा पाण्याअभावी दोन एकर ऊस करपला
पत्रकार नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील शेतकरी धवलकुमार महावीर पाटील व राजकुमार धन्यकुमार पाटील या शेतकऱ्यांचे पाण्याअभावी दोन एकर ऊस (sugar cane) करपला. टाकळीवाडी मध्ये माळ भाग शेती जास्त असल्यामुळे यावर्षी वळवाच्या पावसाने सुद्धा दांडी मारल्यामुळे विहीरी, बोर ,यांना पाणी कमी आले होते. पाण्याचे नियोजन होत नव्हते.
सध्या शेती खर्च एकरी ५०.०००/- हजार रुपये खर्च येतो. सध्या ऊस करपल्यामुळे उत्पन्न किती निघणार व शेती कशी परवडणार याच्या चिंतेत शेतकरी आहेत. सध्या शेती परवडत नाही. पाणी हे पिकाच राजा आहे. पाण्याअभावी शेती शक्य नाही. सध्या शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
सोमवारी झालेल्या वळवाच्या पावसामुळे थोडाफार आधार झालेला आहे पिकांना. ऊस (sugar cane) पिकाला पाणी भरपूर लागते . ऊस करपल्यामुळे शेतकरी नाराज शेतकऱ्याने जगायचे कसे हा प्रश्न आता निर्माण झालेला.