घरातून उचलून नेत तरुणीवर सामूहिक अत्याचार

(crime news) सहा तरुणांनी एका तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना झारखंडमधील पलामू इथं उघडकीस आली आहे. नराधम तरुणांनी एवढ्यावरच न थांबता बलात्काराचा व्हिडीओसुद्धा शूट केला. यानंतर पीडितेला धमकी दिली की याबद्दल कोणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करू. या घटनेनंतर पीडितेने कुटुंबीयांसह पोलिसात धाव घेत गावातील सहा तरुणांविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

हुसैनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय. पीडित मुलीच्या घरातील सर्व जण लग्ना सोहळ्यासाठी गेले होते. मुलगी घरात एकटीच होती हे पाहून नराधमांनी मुलीला घरापासून काही अंतरावर नेलं. त्यानंतर सहा जणांनी तिच्यावर अत्याचार केले. याचा व्हिडीओसुद्धा केला.

तरुणांच्या तावडीतून तरुणीने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर ती घरी गेली आणि कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. पीडित तरुणी वडिलांसह पोलिसात गेली आणि लेखी तक्रार दाखल केली. यानंतर तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. (crime news)

याप्रकरणी हुसैनाबाद एसडीपीओ पूज्य प्रकाश यांनी सांगितलं की, पीडितेच्या कुटुंबीयांनी सहा तरुणांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशीही माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *