प्रगतशील शेतकरी संतोष नाना सावंत यांना स्पीड आयकॉन पुरस्कार 2023
पत्रकार नामदेव निर्मळे
अकिवाट तालुका शिरोळ येथील प्रगतशील शेतकरी (farmer) संतोष नाना सावंत यांना स्पीड आयकॉन पुरस्कार 2023 प्राप्त झाला. या प्रगतशील शेतकऱ्याने २० गुंठ्यामध्ये १० प्रकारची पिके सेंद्रिय पद्धतीने घेतलेली होती. याची दखल प्रसार माध्यमाने घेतलेली होती.
२० गुंठ्यामध्ये १० प्रकारची सेंद्रिय पिके घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. शेतातील पीक पाहण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. सेंद्रिय शेती कशी करावी हे या शेतकऱ्याकडून शिकावे लागेल. अनेकांचे हे शेतकरी (farmer) प्रेरणास्थान बनले आहे. सेंद्रिय शेतीचे महत्त्व आता लोकांना कळू लागले आहे.