टाकळीवाडी चे सुपुत्र मा.गणपती बंडू खोत साहेब पी.एस.आय यांचा खडतर प्रवास करून महाराष्ट्र पोलीस मधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल गावामधून भव्य जंगी मिरवणूक
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री गणपती बंडू खोत यांचे शिक्षण दहावी झाले. अतिशय खडतर प्रवास करून त्यांनी नोकरी मिळवली. १ली ते ९ वी पर्यंत ते दत्तवाड तालुका शिरोळ येथील शाळेमध्ये पायी अनवाणी चालत जाऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
टाकळीवाडी सारख्या साध्या खेड्या गावातून पी.एस.आय. पर्यंत त्यांनी मजल मारली. पूर्वी गावामध्ये पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. परिस्थितीवर मात करत अतिशय जिद्दीने त्यांनी महाराष्ट्र पोलीस मध्ये रुजू झाले.
टाकळीवाडी ते दत्तवाड हा ४ किलोमीटरचा रस्ता अतिशय पूर्णपणे खराब झालेला होता. गुडघाभर रस्त्यात खड्डे होते. पावसाळ्यात तर अतिशय परिस्थिती वाईट होती. रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असायचे. खड्ड्यातूनच चालत जाऊन शाळा गाठायची.
परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे अंगावर शाळेचा गणवेश सुद्धा मिळायचा नाही. फाटके तुटके शर्ट असायचे. शर्टला बटणे नसायची. पावसाळ्यात अंगावर एखादे गोणपाट घेऊन आपले कसेबसे दप्तर न भिजवता ती शाळा गाठावायचे. हिवाळ्यात अंगावर स्वेटर सुद्धा मिळायचे नाही. अशा परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
पाटी, पेन्सिल, आणायला पैसे नसायचे शनिवारी रविवारी ते इतरांच्या शेतामध्ये कामाला जाऊन पैसे गोळा करायचे व त्यातून आपले शिक्षणाचे सर्व साहित्य घ्यायचे. देशासाठी काहीतरी करावे हे सारखे मनात त्यांच्या रुजत होते. ते दोन वेळा भारतीय सेना मध्ये भरती सुद्धा झाले. परंतु घरच्या परिस्थितीमुळे ते जाऊ शकले नाहीत. (local news)
अशा परिस्थितीत ते 1984 यावर्षी कोल्हापूर येथे महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले. यांचे ट्रेनिंग पुणे येथील रामटेकडी येथे 13 महिने पूर्ण केले. ट्रेनिंग नंतर त्यांना पहिलं पोलीस स्टेशन दौंड पुणे येथे मिळाले. दौंड पुणे ते २० वर्षे त्यांनी सेवा करून त्यांची बदली रत्नागिरी येथे ४ वर्षे त्यांनी सेवा केली. त्यानंतर १५ वर्षे त्यांनी कोल्हापुरात आपली सेवा बजावली.
हवालदार या पदानंतर त्यांची पी.एस.आय पदी निवड झाली. ते महाराष्ट्र बरोबर बिहार, गुजरात ,पंजाब ,गडचिरोली ,आदी राज्यात सुद्धा त्यांनी सेवा बजावली. त्यांची 31 मे 2023 रोजी पी.एस.आय पदावरून 39 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांची गावांमधून भव्य जंगी मिरवणूक काढण्यात आली. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चिरंजीव मा.अजय राजेंद्र पाटील यांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी त्यांचे अतिशय उत्साहात मिरवणूक काढली. फेटे बांधून समस्त गावकरी व गावातील सर्व तरुण मंडळे तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी चौका चौकात डिजिटल बोर्ड लावून त्यांना शुभेच्छा दिल्या.सैनिक असोसिएशन चे सर्व आजी-माजी सैनिक उपस्थित होते.