बुधगावमध्ये घरफोडी; रोकड, दागिने लंपास
(crime news) बुधगाव येथील मयूर गल्लीतील विजयकुमार बसाप्पा ढमणगे (वय 65) यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व 85 हजार रोकड असा पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत चोरट्याविरूद्ध सांगली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढमणगे कुटुंबीय दि. 20 जूनरोजी परगावी गेले होते. याचदिवशी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटाला लॉक होता. चोरट्यांनी डब्यात काही मिळते का पाहिले. डब्यात कपाटाच्या चाव्या सापडल्या. त्याने कपाट उघडून साहित्य विस्कटले. लॉकरमधील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने व 85 हजार रोकड लंपास केली.
दि. 21 जूनरोजी सकाळी नऊ वाजता ढमणगे कुटुंब आले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनीही भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकास पाचारण केले. श्वानाने महादेव मंदिरपर्यंत माग दाखविला. (crime news)