जिल्हा परिषद शाळा कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी येथे शिक्षक नेमणूक करणे बाबत गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन
पत्रकार नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर येथे शिक्षक (teacher) संख्या कमी आहे. येथे पहिली ते सातवी पर्यंत एकूण विद्यार्थी ,विद्यार्थीनी, 260 आहेत. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. या शाळेतील विद्यार्थी गुणवंत आहेत.
विद्यार्थ्यांना शिक्षक (teacher) नसल्यामुळे त्यांचा अभ्यासावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान होत आहे. शिक्षक भरती त्वरित करावी या मागणीसाठी निवेदन शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी, गट विकास अधिकारी मा. शंकर कवितके साहेब, शिक्षणाधिकारी श्री कामत साहेब यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना बाबासाहेब वनकोरे (माजी सरपंच), कुशाल कांबळे (माजी तंटामुक्त अध्यक्ष, माजी सरपंच), शालेय समिती अध्यक्ष सौ शुभांगी खोत, शालेय समिती सदस्य तुकाराम खोत, कृष्णा खोत, संतोष चिगरे, संतोष कांबळे,निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. त्वरित शिक्षक नेमणूक करावे या मागणीसाठी जोर धरला.