देश सेवे बरोबर समाजसेवा; टाकळीवाडीचा फौजी निलेश बदामेची जोरदार चर्चा
पत्रकार नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सैनिक श्री निलेश बदामे हे भारतीय सेना मध्ये आहेत. हे देश सेवा बरोबर समाजसेवा करत आहेत. टाकळीवाडीला नदी नाही. यंदा पावसाने दांडी मारली. गावातील बोर ,विहिरी यांना पाणी (water) कमी आले आहे. गावामध्ये जनावरांची संख्या सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात खर्चासाठी लागत आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला होता. महिलांचा त्रास वाढलेला होता. पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले होते.
यातच देवदूत म्हणून सैनिक निलेश बदामे यांनी आपल्या बोरचे पाणी गावासाठी खुले करून दिले आहे. हवे तेवढे पाणी गावकरी घेऊन जात आहेत. निस्वार्थपणे एक सामाजिक कार्य करत आहेत. देश सेवा बरोबर समाजसेवा ही सैनिक करतात याचे उत्तम उदाहरण आहे.
सैनिक बोलताना म्हणाले की देश सेवेबरोबर समाजसेवा ही महत्त्वाची आहे. अशा संकट काळात मदत करणे हे प्रत्येक सैनिकाचे कर्तव्य आहे. हीच माणुसकी जपली पाहिजे. पाणी म्हणजे जीवन आहे. सर्वत्र यांचे कौतुक होत आहे. सैनिक हे निस्वार्थ व प्रामाणिक असतात. फौजींचे कार्य अनमोल आहे. गावागावात चर्चा चालू आहे. स्त्रियांच्या कडून त्यांचे आभार मानले जात आहे. स्त्रियांचे हाल वाचले आहेत.
केव्हाही या व हवे तेवढे पाणी (water) घेऊन जावा असे उद्गार त्यांच्या तोंडातून येत आहेत. फौजी हे सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आपली सेवा करत आहेत. सैनिकांनी आपल्या घरी सांगितले आहे की गावकऱ्यांना हवे तेवढे पाणी द्या कशाची परवा न करता. फौजी असावा तर असा असे म्हण आता प्रचलित होत आहे. टाकळीवाडी हे सैनिकांची वाडी म्हणून ओळखली जाते.