BCCI संपवणार ‘या’ खेळाडूंचं टी-20 करियर
(sports news) टीम इंडिया ( Team India ) सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या ठिकाणी टीम इंडियाला 5 टी-20 सामने खेळायचे असून बुधवारी रात्री टी-20 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीला ( Virat Kohli ) टीममध्ये संधी देण्यात आलेली नाही. दरम्यान या टीमचं सिलेक्शन करताना अजून एका खेळाडूला डावलण्यात आलं.
टी-20 सिरीजमध्ये नवे चेहरे
वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 टीमची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या टीममध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. मुंबई आणि हैदराबादचा फलंदाज टिळक वर्मा हा टीममध्ये नवा चेहरा आहे. गेल्या 2 इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने चांगला खेळ करत स्वतःला सिद्ध केलंय.
BCCI संपवलं काही खेळाडूंचं करियर
शिवाय टी-20 यशस्वी जयस्वाल पुढील आठवड्यात टेस्ट डेब्यू करण्यासाठी सज्ज आहे. आयपीएलमधील ( IPL 2023 ) चांगल्या कामगिरीनंतर तो T20 टीमचा देखील एक भाग आहे. बुधवारची बैठक ही राष्ट्रीय निवड समितीचे मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांची पहिलीच बैठक होती. मात्र यावेळी डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला टीममध्ये मात्र स्थान मिळू शकलं नाही.
वरिष्ठ खेळाडूंना आराम की बाहेरचा रस्ता?
टी-20 सिरीजमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहली यांनी आराम देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे जडेजालाही विश्रांती देण्यात आलीये. दरम्यान आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, या वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे की, बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (sports news)
वेगवाग गोलंदाजीची धुरा नवख्या खेळाडूवर
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या अनुपस्थितीत वेगवागी गोलंदाजीची धुरा आवेश आणि उमरान मलिकसोबत अर्शदीप सिंग सांभाळणार आहे. याशिवाय मुकेश कुमार टीम इंडियाकडे बॅक-अप गोलंदाज म्हणून काम पाहणार आहे.
वेस्ट इंडिजविरूद्ध टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार