कॅप्टन कूल धोनीच्या आयुष्यावर येणार दुसरा चित्रपट
(sports news) टीम इंडियाचा कॅप्टन कूल अशी ओळख असणाऱ्या महेंद्र सिंग धोनीचा ( MS Dhoni ) आज वाढदिवस आहे. धोनी त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करतोय. महेंद्र सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) टी-20 आणि वनडे या फॉर्मेटमध्ये वर्ल्डकप जिंकले आहेत. धोनीच्या ( MS Dhoni ) कर्तृत्व पाहता त्याच्यावर बायोपिक देखील काढण्यात आला होता. धोनी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी माहिती देतो. मात्र ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या बॉलिवूड चित्रपटानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा झालाय.
एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात धोनीची पहिली गर्लफ्रेंड प्रियांका झा हिच्याबद्दल माहिती देण्यात आलीये. या सिनेमात प्रियांकाची भूमिका बॉलीवूड स्टार दिशा पटानीने केलीये. 2002 मध्ये ज्यावेळी धोनी टीम इंडियामध्ये स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्नात होता त्यावेळी त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती.
2003-04 मध्ये झिम्बाब्वे आणि केनिया दौर्यासाठी दोनीची भारत ‘अ’ संघात निवड झाली होती. त्यानंतर भारतीय टीममध्ये त्याची निवड होण्यापूर्वीच धोनीच्या आयुष्यात एक मोठे वादळ आलं. ज्यामुळे त्याचं आयुष्य जणू उद्धवस्त झालं.
अपघातात प्रियंकाचा झाला मृत्यू
धोनीची पहिली प्रेयसी प्रियांका झा हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. धोनीचे प्रियंकावर खूप प्रेम होतं आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. मात्र दुर्दैवाने प्रियांकाचा कार अपघातात मृत्यू झाला. एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी ( M.S. Dhoni: The Untold Story ) या सिनेमाद्वारे ही माहिती मिळाली आहे.
प्रियांकाच्या मृत्यूनंतर एमएस धोनी फार खचला असल्याचं समजलं होतं. यावेळी धोनीने बराच वेळ मैदानाबाहेर घालवला. प्रियांकाच्या मृत्यूनंतर धोनी जास्त काळ क्रिकेट खेळू शकणार नाही, असे लोकांना वाटत होते. मात्र यावेळी धोनीने हार मानली नाही आणि टीम इंडियात स्वत:ची जागा निश्चित केली. यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये जणू धोनी पर्व सुरु झालं. (sports news)
धोनीवर येणार पुन्हा सिनेमा
भारतात धोनीच्या चाहत्यांची क्रेझ काही कमी नाही. अशातच पुढच्या वर्षी धोनीच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट येणार आहे. ‘मिस्टर एंड मिसेस माही’ या चित्रपटाचं नाव आहे. शरण शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. 15 मार्च 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.