सोशल मीडियावर BCCI च्या ट्विटने मोठी खळबळ

(sports news) येत्या 12 तारखेपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. सध्या टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजसोबत पहिल्यांदा टीम इंडियाला 2 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळायची आहे. टेस्ट टीमसाठी उपकर्णधार पदाची धुरा ही मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर ( Ajinkya Rahane ) सोपवण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयच्या एका ट्विटनुसार, दुखापतीमुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर बीसीसीआय ( BCCI ) नावाच्या अकाऊंटवरून करण्यात आलेलं हे ट्विट खूप व्हायरल होतोय. या ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर पडला असून प्रियांक पांचाळला त्याच्या जागी टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

अजिंक्यच्या जागी प्रियांकला संधी?

सोशल मीडियावर एक ट्विट व्हायरल होतंय. ज्यामध्ये अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane ) दुखापत झाली असून तो वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर पडलाय. रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) हाताला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली असून 2 टेस्ट सामन्यांच्या सिरीजमधून तो बाहेर पडलाय. यावेळी त्याच्या जागी प्रियांक पांचाळचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

खरंच अजिंक्य वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर?

मुख्य म्हणजे, ज्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आलीये ते बीसीसीआयचे फेक अकाऊंट असल्याची माहिती आहे. अद्याप अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane ) दुखापत झाली असून त्याच्या जागी प्रियांक पांचाळला संधी मिळण्याबाबत बीसीसीआयने ( BCCI ) अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. (sports news)

अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची धुरा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अजिंक्यने ( Ajinkya Rahane ) 18 महिन्यांनी टीममध्ये कमबॅक केलं. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर टेस्ट टीमच्या उपकर्णधार पदाची अजिंक्य रहाणेवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उप कर्धणार म्हणून अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) चाहत्यांना दिसणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाकडून एकटा अजिंक्य रहाणे कांगारूंशी लढला होता. कमबॅक करत त्याने संधीचं सोनं केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *