टाकळीवाडी येथे प्रशासकीय अधिकारी यांचा निरोप संभारंभ व नव्याने रुजू होणारे प्रशासकीय अधिकारी यांचा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
पत्रकार नामदेव निर्मळे
_________
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील आज ग्रामपंचायत टाकळीवाडी येथे १५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर कर्तव्यदक्ष ग्रामसेवक आमचे सन्माननीय मित्र श्री.एन.एच.मुल्ला साहेब यांची सेवा बदली निमित्त निरोप समारंभ (ceremony) संपन्न झाला.
अतिशय भावनिक वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला.त्याच वेळी मंडळ अधिकारी श्री. विनायक माने साहेब , गावकामगार तलाठी श्री. महेश साळवी साहेब व कृषी सहायक श्री. जयपाल बेरड साहेब यांचा देखील सेवा बदली निमित्त निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. एक अत्यंत भावनिक सोहळा पार पडला.
त्याचबरोबर नव्याने रुजू होणाऱ्या ग्रामसेविका अनघा सावगावे मॅडम , कृषी सहायक वैदही पाटील मॅडम व गावकामगर तलाठी श्री.अजय नाईक साहेब यांचा स्वागत समारंभ (ceremony) देखील घेणेत आला .
बदली होवून जाणारे अधिकारी व नव्याने येणारे अधिकारी असा संगम यानिमित्ताने सर्वाँना पाहायला मिळाला. याप्रसंगी विद्यमान सरपंच सौ.मंगल बिरणगे, परिवर्तन आघाडी चे सर्व नेते , कार्यकर्ते , माजी सैनिक संघटने चे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायती चा सर्व स्टाफ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.