LIC ची जबरदस्त स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा पेन्शन!

देशातील सर्वात मोठी सरकारी लाइफ इन्शुरन्स कंपनी भारतीय जीवन विमा निगममध्ये प्रत्येक वयोगटासाठी एक पॉलिसी (policy) उपलब्ध आहे. वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनसंबंधीत अनेक एलआयसी योजना आहेत. पण तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षानंतरच पेन्शन मिळणं सुरु झालं तर काय होईल? एलआयसीची एकअशीच योजना आपल्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. ही योजना म्हणजे एलआयसीची सरल पेन्शन योजना. विशेष म्हणजे या योजनेमध्ये तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षामध्ये पेन्शनचा लाभ घेऊ शकता.

योजनेसाठी वयोमर्यादा 40-80 वर्षे आहे

LIC ची सरल पेन्शन योजना ही इमीडिएट एन्यूटी प्लान आहे. त्यात पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन मिळू लागते. या योजनेअंतर्गत पॉलिसी (policy) खरेदी करताना, तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल. पॉलिसीच्या खरेदीदाराचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याच्या ठेवीची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाते. या योजनेसाठी किमान वय 40 वर्षे आणि कमाल वय 80 वर्षे आहे. ही योजना तुम्ही एकट्याने किंवा पती-पत्नीसोबत घेऊ शकता. पॉलिसीधारक ही पॉलिसी सुरू झाल्यापासून 6 महिन्यांनंतर कधीही सरेंडर करू शकतो.

सिंगल लाइफ आणि जॉइंट अकाउंट

सरल पेन्शन योजनेचा लाभ दोन प्रकारे घेता येतो. पहिले सिंगल लाइफ आणि दुसरे जॉइंट लाइफ. जोपर्यंत पॉलिसीधारक सिंगल लाइफमध्ये जिवंत आहे, तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. मृत्यूनंतर गुंतवणुकीचे पैसे नॉमिनीला परत केले जातील. तर पती-पत्नी दोघेही संयुक्तपणे गुंतलेले असतात. यामध्ये पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत पेन्शन दिली जाते. मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला पेन्शनचा लाभ मिळतो. दोघांच्या मृत्यूनंतर, जमा केलेली रक्कम नॉमिनीला दिली जाते.

किमान 1000 रुपये पेन्शन उपलब्ध आहे

सरल पेन्शन योजनेअंतर्गत, तुम्ही किमान मासिक पेन्शन रु 1000 घेऊ शकता आणि कमाल पेन्शनवर कोणतीही मर्यादा नाही. ही पेन्शन तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेवर अवलंबून असते. पेन्शनसाठी तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पेन्शनचा ऑप्शन मिळतो. जर कोणत्याही 42 वर्षांच्या व्यक्तीने 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी केली तर त्याला दरमहा 12,388 रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *