टाकळीवाडीतील गावतलाव मोजणी करण्यासाठी ग्रामसेविका यांना निवेदन
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील समाजसेवक लक्ष्मण चिगरे व आकाश वडर यांच्यावतीने 1972 वर्षी दुष्काळ काळात खोदलेल्या तळ्याची मोजणी करण्यात यावी व सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी निवेदन ग्रामपंचायत टाकळीवाडी येथील ग्रामसेविका सौ. अनघा सांगावे मॅडम यांना देण्यात आले.
या तळ्याचे क्षेत्र ३ हेक्टर 91 आर असे असून सध्या येथे एवढे क्षेत्र भरत नाही. 1972 काळी दुष्काळ पडला होता.गावकऱ्यांना काम नव्हते. भविष्यात पाणी टंचाई भासू नये पाणी साठा करता यावा या उद्देशाने हा तळा खोदण्यात आला.
परंतु आता तळा नामशेष होण्याच्या मार्गावरआहे.अनेकांनी या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेले आहे. सध्या तळ्याचे क्षेत्र अतिक्रमणामुळे कमी झालेले आहे. सध्या टाकळीवाडी गावामध्ये पाणी प्रश्न गंभीर असल्यामुळे त्वरित या तळ्याची मोजणी करावे अशी मागणी आता जोर धरत आहे.
आता फक्त हा तळाच भविष्यात गावासाठी वरदान ठरणार आहे. यावर्षी सुद्धा दुष्काळाचे स्वरूप दिसून येत असल्यामुळे गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहे. गावाला नदी नाही. सध्या गावांमध्ये पाणीटंचाई फार आहे. ग्रामसेविका नुकत्याच आता ग्रामपंचायत मध्ये रुजू झालेले आहेत. आता हा प्रश्न कोणत्या पद्धतीने हाताळणार व ग्रामपंचायत यावर काय निर्णय घेणार याची जोरदार चर्चा गावात चालू आहे. (local news)
विशेष म्हणजे आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीने या तळ्याचा प्रश्न पुढे केलेला नव्हता. हा चर्चेचा विषय बनला आहे. त्वरित मोजणी करून तळ्याचे सुशोभीकरण करावे ही मागणी आता सर्वच ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.