कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर पाऊस पाणी फिरवणार का? हवामान कसं असेल?
(sports news) भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आजपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे. पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे होणार आहे. या सीरीजसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार असे युवा खेळाडू टेस्ट टीममध्ये आहेत. आज होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालला संधी मिळणार हे निश्चित आहे. ऋतुराज गायकवाडला टेस्टमध्ये डेब्युसाठी प्रतिक्षा करावी लागू शकते.
ही सीरीज वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. त्यामुळे सहाजिकच वेस्ट इंडिजला घरच्या वातावरणात खेळण्याचा फायदा मिळेल. त्यांना इथल्या खेळपट्टयांचा चांगला अभ्यास आहे.
दोन्ही टीम्सचा झालाय पराभव
दुसऱ्याबाजूला टीम इंडियाचा वर्ल़्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर हा पहिलाच कसोटी सामना आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारुण पराभव केला. दोन्ही टीम्स पराभवाच्या कटू आठवणी मोग सोडून विजयासाठी मैदानात उतरतील. वेस्ट इंडिजचा सुद्धा वनडे वर्ल्ड कपच्या क्वालिफायरमध्ये पराभव झाला. प्रथमच वेस्ट इंडिजची टीम वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार नाही.
कोण कुठल्या नंबरवर येणार बॅटिंगला?
वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजपासून टीम इंडियाच्या नवीन WTC सायकलला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ओपनिंगला उतरतील. शुभमन गिल चेतेश्वर पुजाराच्या जागी नंबर 3 वर बॅटिंग करेल. विराट कोहली, अजिंक्य रहाणे हे चौथ्या-पाचव्या नंबरवर खेळतील. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांना सुद्धा प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणं निश्चित आहे. (sports news)
पावसाची शक्यता किती?
रोसेऊ डॉमिनिकामध्ये कसोटी सामना होतोय, तिथे हवामान कसं असेल? या बद्दल जाणून घेऊया. आज सूर्यप्रकाश असेल, पण पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे. जास्तीत जास्त तापमान 31 डिग्री सेल्सिअस राहील. पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता 55 टक्के आहे. पण वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता 16 टक्के आहे. कसोटीच्या पहिल्यादिवशी क्रिकेट रसिकांना बऱ्यापैकी क्रिकेट पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी विंडिज क्रिकेट संघ
क्रॅग ब्रेथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टेगेनारिन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.