डी. के. टी. ई. वाय. सी. पी. च्या ३ विद्यार्थ्यांनीची के पी.आय. टी. लि. पुणे या नामांकित कंपनीत वार्षिक ४.१५ लाख पॅकेजवर निवड
इचलकरंजी येथील डी के टी ई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निकच्या ३ विद्यार्थ्यांनींची के पी आय टी टेक्नॉलॉजीज कंपनी लि. पुणे या नामांकित कंपनीत वाषिक ४.१५ लाख रुपये पॅकेजवर निवड (selection) झाली आहे.
तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील श्वेता खामकर, तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग मधील ऐश्वर्या पवळे व तृतीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधील वैष्णवी कोरे यांची निवड झाली आहे.
के. पी. आय. टी. टेक्नॉलॉजीज ही पुणे स्थित बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जी विविध उद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञान सल्ला आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रदान करते. मुख्यत्वे ऑटोमोटिव्ह आणि वाहतूक ही क्षेत्रे असली तरी उत्पादन, ऊर्जा, उपयुक्तता या सारख्या इतर उद्योगांमध्ये ग्राहकांना सेवा देते.
के. पी. आय. टी. टेक्नॉलॉजीज कंपनीतर्फे नुकताच कॅम्पस इंटरव्यूव आयोजित केला होता. त्यामधून कॅम्पस इंटरव्यूव प्रोसेस मध्ये टेक्निकल राऊंड एटीट्यूड टेस्ट तसेच पर्सनल एचआर इंटरव्यूव इत्यादी फेऱ्या घेण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड (selection) झाली.
विद्यार्थ्यांच्या नामांकित कंपनीतील या निवडीने पॉलीटेक्निकची गुणवत्ता व दर्जेदार तंत्रशिक्षण यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे मनोगत मानत सचिव डॉ. सपना आवाडे यांनी व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व संचालकांचे सहकार्य लाभले. सदरच्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए. पी. कोथळी, उपप्राचार्य प्रा. बी. ए. टारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एम. बी. चौगुले डीकेटीई च्या कार्यकारी संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे, विभाग प्रमुख प्राध्यापक व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.