जयसिंगपूर बाजारात नागरिकांची उडाली चांगली तारांबळ
येथील रविवारी आठवडी बाजारात सायंकाळी 6 च्या दरम्यान नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने चांगलाच धुमाकूळ घातला. महिला, वृद्ध, तरुण यांच्यासह बाजारात असलेल्या 8 जणांना चावा (bite) घेतला आहे. या घटनेमुळे शाळा क्र. 2 च्या परिसरातील बाजारात नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. अखेर नागरिकांनी कुत्र्याचा पाठलाग करून बाजारातून बाहेर काढले.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी सायंकाळी आठवडी बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी होती. अशातच नाट्यगृहाच्या समोरील रस्त्याने थेट पिसाळलेले कुत्रे थेट बाजारात आले. यावेळी बाजारात असलेल्या महिला, वृद्ध, तरुण अशा 8 जणांवर हल्ला करून त्याने चावा घेतला. त्यामुळे बाजारात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. अखेर नागरिकांनी प्रसंगावधान राखून या पिसाळलेल्या कुत्र्याला बाजारातून हाकलून लावले. त्यानंतर बाजारातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. कुत्र्याने चावा (bite) घेतलेल्या नागरिकांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे जयसिंगपूर पालिकेने शहरातील मोकाट कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कोल्हापुरात पोलिस जखमी
भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने राजारामपुरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल मिलिंद जोतिबा मालाई (वय 41, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) हे जखमी झाले. माऊली पुतळा ते यादवनगर मार्गावर शनिवारी (दि. 15) रात्री ही घटना घडली.