शिरोळ तहसीलदार व गटविकास अधिकारी सैनिकांच्या पाठीशी

पत्रकार नामदेव निर्मळे

सैनिक (soldier) फेडरेशनचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मा. संजय माने शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष मा.दिनकर घाटगे कोल्हापूर जिल्ह्याचे संघटन रमेश निर्मळे साहेब, केंदबा कांबळे साहेब, शिरोळ सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय इंगळे साहेब, टाकळी वाडी सैनिक संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब खोत साहेब, आणि तालुक्यातील सर्व सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी यांनी शिरोळ तालुक्याचे तहसीलदार श्री. अनिल कुमार हेळकर साहेब, BDO साहेब श्री कवितके साहेबांची भेट घेतली.

कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा केली. आणि ६ जुलै २०२३ रोजी सैनिक दरबार हॉल मध्ये झालेल्या सैनिकांच्या समस्या सोडवण्याबद्दल जे अर्ज आले होते ते आज पूर्णपणे कशा पद्धतीने निकाली काढता येतील त्यावर ती सर्वांच्या अर्जाविषयी पूर्णपणे माहिती तहसीलदार साहेबांनी सांगितली व जे त्यांच्या अधिपत्याखाली आहे ते निकालात काढण्याचे आश्वासन दिले .

तालुक्यातील कोणत्याही सैनिकाच्या (soldier) समस्या प्राथमिक ते घेऊन प्राथमिकतेने घेऊन सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन असे साहेबांनी सर्व सैनिकांना मानसन्मान ठेवून सर्व कामे करण्यात येतील असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *