पौष्टिक – चटपटीत – खस्ता – त्रिकोणी मठरी

पौष्टिक – चटपटीत – खस्ता – त्रिकोणी मठरी
घटक
30 मिनिटे
4 वाट्या रवा
1/2 वाटी मैदा
9 टीस्पून तुपाचे मोहन
गाजर रस (केशरी)
बीट रस (लाल)
मेथी, पालक, कोथिंबीर रस (हिरवा)
पांढरा नेहमी प्रमाणे
पाणी गरजेनुसार
मीठ + काळ (salt) मीठ चवीनुसार
1 टीस्पून चाट मसाला
तेल तळणीसाठी
कुकिंग सूचना
स्टेप 1
रवा, मैदा, मिक्स करून घ्या. तुपाचे मोहन घालून एकजीव करावे. त्याची मूठ तयार झाली पाहिजे. नंतर त्यात चाट मसाला, ओवा, कसूरी मेथी, काळ (salt) मीठ आणि मीठ चवीनुसार घालून मिक्स करावे. चार भागात पीठ विभागून घ्या.
स्टेप 2
पहिला पांढरा भाग नेहमी प्रमाणे थोडे थोडे पाणी घालून गोळा घट्ट मळून घ्या.
दुसरा भागात गाजर रस घालून गोळा घट्ट मळून घ्या.
तिसर्या भागात पालक मेथी रस घालून गोळा घट्ट मळून घ्या.
चौथ्या भागात बीट रस घालून गोळा घट्ट मळून घ्या.
स्टेप 3
प्रत्येक गोळा वेग वेगळा मिक्सर मध्ये थोडे तूप घालून प्लस मोड वर फिरवून घ्यावे.
तयार पिठाचे गोळे नंतर झाकून ठेवा. आता 1 गोळा घेऊन तो लाटून घ्या. त्याला काट्या चमच्याने टोचे मारा. नेहमी प्रमाणे चौकोनी आकारात कट करुन घ्या. नंतर त्याचे त्रिकोणी आकारात कट करा.
स्टेप 4
पौष्टिक – चटपटीत – खस्ता – त्रिकोणी मठरी तयार आहे. सर्व्ह करावे.