ट्राय करा ‘इजिप्शियन बिन्स’ रेसिपी
‘इजिप्शियन बिन्स’
साहित्य :
उकळून घेतलेला राजमा 2 वाट्या (इजिप्तमध्ये फावा बिन्स वापरतात. त्या पावट्यासारख्या असतात.) 2—3 लसूण पाकळ्या ठेचलेल्या, लिंबाचा रस अर्धी टी स्पून, ऑलिव्ह (oil) ऑईल 3 टेबल स्पून, मीठ, काळीमिरी पूड चवीनुसार. बारीक चिरलेले 3 टोमॅटो, जिरे पूड अर्धा टीस्पून, पुदिना चिरलेला 2 टी स्पून, लाल मिरची पूड अर्धा टी स्पून, लाल सिमला मिरची 1. सोबत सर्व्ह करण्यासाठी कोणताही ब्रेड.
कृती :
तेल (oil) गरम करून त्यात लसून परतून घ्या. मग उरलेले साहित्य बिन्स, राजमासह टाकून व्यवस्थित घोटून घ्या. साधारणपणे 10 मिनिटे शिजवा. खूप जास्त स्मॅश करू नका. जरा भरड असायला हवे. ब्रेडसोबत किंवा ब्रेड टोस्टबरोबर गरमागरम सर्व्ह करा. ही डिश साधारणपणे इजिपतमध्ये ब्रेकफास्टसाठी खाल्ली जाते.