टोस्ट खीर रेसिपी
आतापर्यंत आपण विविध प्रकारच्या खिरींचा आस्वाद घेतला असावा. पण कधी टोस्ट (Rusk) खिरीची चव चाखली आहे का? टोस्टची खीर तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. ही रेसिपी काही मिनिटांतच तयार होते. सणासुदीच्या दिवशी ही टेस्टी खीर नक्की ट्राय करून पाहा. चला तर जाणून घेऊया मलईदार आणि स्वादिष्ट टोस्ट खिरीची पाककृती…
टोस्टची पावडर
तूप (ghee)
सुकामेवा
दूध
साखर
वेलची पावडर
टोस्ट खीर रेसिपी
Step 1: सुकामेवा तुपात फ्राय करा
पॅनमध्ये तूप गरम करत ठेवा. तूप (ghee) गरम झाल्यानंतर सुकामेवा फ्राय करून घ्यावा.
Step 2: टोस्टची पावडर आणि दूध मिक्स करा
यानंतर तुपात मिक्सरमध्ये वाटलेली टोस्टची पावडर परतून घ्यावी. आता त्यात एक कप दूध मिक्स करा. मिश्रणाच्या गाठी तयार होऊ नयेत, यासाठी सामग्री ढवळत राहा. आता पॅनमध्ये थोडं आणखी दूध ओता व सर्व सामग्री पुन्हा ढवळून घ्या.
Step 3: चवीनुसार साखर
यानंतर पॅनमध्ये तीन ते चार चमचे साखर मिक्स करा. खिरीमध्ये साखर योग्य पद्धतीने विरघळली आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.
Step 4: वेलची पावडर
यानंतर वेलची पावडर घालून खीर नीट शिजू द्यावी. खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करा.
Step 5: चविष्ट टोस्ट खीर
टोस्ट खिरी तुम्ही गरमागरम किंवा थंड करूनही सर्व्ह करू शकता.