पावसाळ्यात घ्या गरमा गरम कोबी-पोह्यांचा आनंद, जाणून घ्या रेसिपी
पावसाळा आला की काहीतरी चटपटीत आणि गरमा-गरम खावस वाटतं. हातात चहा, भजी आणि पाऊस अस समीकरण सर्वांनाच आवडतं. मस्त थंडगार पावसाळ्यात काहीतरी गरमागरम आणि मजेदार खाण्याची इच्छा होते. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचं नाव आहे, कोबी-पोहे. चला तर मग पाहुयात कशी करायची ही रेसिपी.
कोबी-पोहे साहित्य
१ वाटी पोहे
दिड वाटी किसलेले कोबी (Cabbage)
ज्वारीचे पीठ -अर्धी वाटी
लसूण पाकळ्या- ८ ते १०
मिरची -४ ते ५
ओवा-पाव चमचा
जिरे-अर्धा चमचा
मिठ-
हिंग- हळद, मीठ
चिरलेला कांदा
कोबी-पोहे कृती:
सुरुवातीला पोहे ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या. थोडेसं पाणी (अगदी अर्ध बोट भिजेल एवढ पाणी) त्यात भिजण्यासाठी ठेवा. त्यानंतर मिरची, लसूण, ओवा, जिरे मिक्सरला वाटून घ्या. पेस्ट थोडी जाडसर करा.
त्यानंतर कोबी (Cabbage) स्वच्छ धुवून खिसून घ्या. दिड कप कोबी घ्या. पोहे स्मॅश करा. त्यात ठेचा घाला. त्यानंतर त्यात धनेपूड अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, मीठ ,कोथिंबिर, पाव कप ज्वारीचे पीठ घाला. आता थोडं थोडं पाणी घालून मिश्रण सरसरीत करून घ्या.
त्यात आता किसलेला कोबी, बारिक चिरलेला कांदा घाला. थालीपीठ करतो त्यापेक्षा थोड घट्ट आणि डोसा करतो त्यापेक्षा थोड सैलसर अस पीठ करून घ्या. सरबरीत पीठ करून घ्या.