हॉटेलसारखं शाही फ्लॉवर

आपल्यापैकी अनेक लोकांना फ्लॉवरची भाजी खूप आवडते पण नेहमी नेहमी फ्लॉवरची भाजी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला फ्लॉवरची एक हटके रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये शाही फ्लॉवरची भाजी खाल्ली असावी पण तुम्ही ही टेस्टी भाजी घरी सुद्धा करू शकता. शाही फ्लॉवर कसे बनवायचे? चला जाणून घेऊ या.

साहित्य

फ्लॉवरचे कापलेले तुकडे
मटार
रिफाइंड ऑइल
कांद्याची पेस्ट
टोमॅटोचा गर
लांब कापलेला कांदा (onion)
फेटलेले दही
देशी तूप
हळद पावडर
धणेपावडर
आले व लसूण पेस्ट
काजू
लाल मिरची पावडर
गरम मसाला
कोथिंबीर
मीठ चवीनुसार

कृती

उकळत्या पाण्यात फ्लॉवरचे तुकडे १० मिनिटे ठेवा.
पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मटरही उकळून घ्या.
त्यानंतर काजू २ मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा.
त्यानंतर उकळलेले काजूमध्ये दही मिक्स करुन मिक्सरमध्ये पेस्ट करा. उकळलेले फ्लॉवरचे तुकडे साजूक तूपातून परता.
एका कढईत तेल घाला. कांदा (onion) चांगला परतून घ्या.
त्यानंतर त्यात आले व लसूण पेस्ट टाका. त्यानंतर त्यात काजूची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी घाला.
जेव्हा मिश्रण घट्ट होईल, तेव्हा सर्व मसाले, फ्लॉवर व मटर घाला.
त्यात थोडे गरम पाणी व मीठ घालून जवळपास भाजी शिजू द्या.
त्यावर कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *