राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ‘यांची’ निवड

(political news) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ए. वाय. पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत निवडीचे पत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. गुरुवारी त्यांना जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते. (political news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *